In this book, Shiv Shivakumar points out that today, unlike in the past, all the three elements are your responsibility. With in-depth interviews with top leaders across the spectrum and an insightful foreword by Sachin Tendulkar, The Art of Management is a must-read.
या पुस्तकाद्वारे लेखक शिव शिवकुमार यांनी स्व-व्यवस्थापन, तुमच्या टीमचे व्यवस्थापन आणि तुमच्या उद्योगाचे व्यवस्थापन यांविषयी संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. शिवकुमार यांनी चक्क २१ आघाडीच्या अनुभवी ‘लीडर्स'च्या सखोल आणि सविस्तर मुलाखतींद्वारे व्यवस्थापनाचे हे तिन्ही घटक ही तुमची स्वत:चीच जबाबदारी आहे, असे सारांशरूपाने अधोरेखित केले आहे. शिवकुमार यांनी अनेकविध उद्योगांचे व टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभवसंचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्व-व्यवस्थापन’ या विषयावरील पुस्तकात त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यांनी आजवर मिळवलेले ज्ञान यांतून तरुण पिढी नक्कीच शिकू शकेल. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत स्व-व्यवस्थापन करण्यासाठी माणसाने शिकत राहाणे गरजेचे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ‘प्रोफेशनल्स'चे विचार, मते आणि अनुभव यांचे हे संकलन आहे; तसेच स्व-व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन व बिझिनेस व्यवस्थापन या विषयांनाही स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ‘प्रोफेशनल्स'कडून तुम्हाला शिकता यावे आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत जाणारा मार्ग तुम्हालाच तयार करता यावा हा उद्देश आहे.