登入選單
返回Google圖書搜尋
註釋

या अफाट विश्वातील प्रत्येक द्रव्य पंचमहाभूतांनीच' बनले आहे. अगदी मानवी शरीरातील प्रत्येक पेशीपासून ते थेट त्यांचे पोषण करणारे आहारीय द्रव्यदेखील पांचभौतिक' च आहे. सृष्टीच्या पंचमहाभूत सिद्धांताचे' पायावर बृहत्त्रयीरत्न वैद्यराज दातारशास्त्रींनी 'पांचभौतिक चिकित्सा प्रणाली' प्रचलित केली.

आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, शरीरस्वास्थ्य, त्यातील बदलांमुळे होणाऱ्या व्याधी आणि त्यांच्यातील समतोल राखण्यासाठी करायची चिकित्सा, ही याच पांचभौतिक विचारधारेने" ठरवण्याचे तत्त्व म्हणजेच पांचभौतिक चिकित्सा प्रणाली होय! या विचारधारेचा गुरुमुखातून आलेला अनुभव आणि प्रत्यक्ष घेतलेली प्रचिती, पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्याची, आमची ही छोटीशी शास्त्राची सेवा !